नवऱ्यानेच केली बायकोची हत्या

Mumbai  -  

अंधेरी - चार बंगला परिसरात नवऱ्यानेच आपल्या बायकोची हत्या केल्याचे समोर आले आहे. सूरज असे या आरोपीचे नाव आहे. त्याची बायको प्रीती माहेरी गेली होती. माहेरी जाऊन सूरजने प्रीतीवर हातोड्याने हल्ला केला. त्यानंतर स्वत: पोलिसात शरण आला.

साई मंगल रहिवासी मंडळ येथे हे नवरा-बायको राहत होते. चार वर्षापूर्वी यांचा प्रेमविवाह झाला होता. पण सूरज नेहमी प्रीतीवर संशय घेत असे. त्यावरून त्यांच्यात अनेकदा वाद व्हायचे. रोजच्या वादाला कंटाळून प्रीती माहेरी गेली होती अशी माहिती नातेवाईकांनी दिली.

Loading Comments