बाप्पाला कागद आणि कापडाची आरास

 Masjid Bandar
बाप्पाला कागद आणि कापडाची आरास
Masjid Bandar, Mumbai  -  

मस्जिद बंदर - मांडवीचा राजा सार्वजनक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायासाठी यंदा कापड आणि कागदाची विशेष आरास करण्यात आलीय. साधेपणानं सजावट केल्यानं पैशांची बचत झालीय. याच पैशातून हे मंडळ मोफत धान्य वाटप, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीरासारखे अनेक सामाजिक उपक्रमही राबवत आहे. या मंडळाचे अध्यक्ष विकास खिचडे आहेत. तर विलोभनीय अश्या मुर्तीचे मुर्तीकार राजन झाड आहेत. या इको फ्रेंडली बाप्पाला पाहण्यासाठी अनेक नागरिकांनी गर्दी केलीय. 

Loading Comments