कपिलवर कारवाई करण्याची मनसेची मागणी

 Andheri west
कपिलवर कारवाई करण्याची मनसेची मागणी
कपिलवर कारवाई करण्याची मनसेची मागणी
See all

वर्सोवा - तिवरांची तोडणी करून अतिक्रमण करणा-या कपिल शर्माविरोधात गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्याची मागणी मनसेने केली आहे. याबाबत मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे आणि मनपा गटनेते संदीप देशपांडे यांनी वर्सोवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळे यांना सादर करण्यात आले. 

कपिल शर्माविरोधात अनधिकृत भरणी बांधकाम आणि तिवरांच्या तोडणीबाबत अनधिकृत गौणखनिज भराव अंतर्गत म.ज.म. अधिनियम १९६६चे कलम ४८(७) व (८)नुसार कायदेशीर  कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. कारवाई नाही झाली तर मनसे स्टाईलने सामान्य जनतेच्या पुढे आंदोलनाच्या माध्यमातून आणल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा मनसेने दिला आहे. 

 

Loading Comments