Advertisement

लोकायुक्तांकडून वायकरांच्या चौकशीचे आदेश


लोकायुक्तांकडून वायकरांच्या चौकशीचे आदेश
SHARES

फडणवीस सरकारमध्ये राज्यमंत्री असलेल्या रवींद्र वायकर यांच्या आमदार निधीतून आरे वसाहतीच्या जमिनीवर झालेल्या व्यायामशाळेच्या अनधिकृत बांधकामाविरोधात लोकायुक्तांनी चौकशीचे आदेश दिल्याची माहिती मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली आहे. आरे वसाहतीच्या जमिनीवर राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी अनधिकृतपणे उभारलेल्या अत्याधुनिक व्यायामशाळेच्या विरोधात लोकायुक्तांकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीची मंगळवारी तिसरी सुनावणी होती. या सुनावणीदरम्यान सदर बांधकाम अनधिकृत असल्याचे माहित असूनही ते बांधकाम पाडण्यात वायकर यांना अपयश का आले, याची सखोल चौकशी करण्यात येईल, असे आदेश लोकायुक्तांनी दिल्याचे निरुपम यांनी सांगितले.

 

 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा