गणेश मित्र मंडळ स्थापित नवसाला पावणारा अशी ओळख असलेल्या मुलुंडच्या राजाचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. मंडपाचे कामकाज शेवटच्या टप्प्यात सुरू असून यावर्षी 'राजमहाल' या संकल्पनेवर आधारित सजावट असणार आहे. बाप्पाची भल्या मोठ्या मूर्तीची स्थापना आणि आकर्षक सजावट हे यांचे खास वैशिष्ट्य आहे.