Advertisement

कांजुर, पवईत आढळले दोन तरुणांचे मृतदेह


कांजुर, पवईत आढळले दोन तरुणांचे मृतदेह
SHARES

कांजुरमार्ग आणि पवईमध्ये शनिवारी दोन तरुणांचे मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पवईतल्या तुंगा गाव परिसरात दुचाकीजवळ एक तरुण बेशुद्धावस्थेत पडला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर तरुणाला उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून मृतदेहाची ओळख पटवण्यात येत असल्याचं पवई पोलिसांनी सांगितले. तर लिंक रोडवरील कांजुर टी जंक्शनजवळ आणखी एका तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. या तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.


 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा