गणेशोत्सव मंडप, व्यायामशाळेचं उद् घाटन

Kumbharwada
गणेशोत्सव मंडप, व्यायामशाळेचं उद् घाटन
गणेशोत्सव मंडप, व्यायामशाळेचं उद् घाटन
See all
मुंबई  -  

कुंभारवाडा - सी विभागातल्या दुसरा कुंभारवाडा येथे माघी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातल्या व्यायामशाळेचं काम 5 महिन्यांपासून सुरू होते. नूतनीकरण झाल्यानतंर व्यायामशाळा आणि गणपती मंडपाचा उद् घाटन सोहळा मंगळवारी रात्री झाला. कुंभारवाड्यातल्या नागरिकांसाठी ही मोफत व्यायामशाळा उघडण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 217 च्या नगरसेविका युगंधरा साळेकर यांच्या निधीतून आणि मंडळाचे अध्यक्ष अजय चौरसिया यांच्या प्रयत्नांतून हे काम करण्यात आलं. मंडळाच्या व्यायामशाळा आणि गणपती मंडपाचं उद् घा टन शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते झाला. या वेळी उपनेते रवींद्र मिर्लेकर, विभागप्रमुख, उपविभागप्रपुख, युवासेना समन्वयक, शाखाप्रमुख, मंडळाचे अध्यक्ष, मंडळाचे सचिव, मंडळाचे खजिनदार आदीही उपस्थित होते..

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.