गटाराचे झाकण तुटलेल्या अवस्थेत

  Lower Parel
  गटाराचे झाकण तुटलेल्या अवस्थेत
  मुंबई  -  

  वरळी नाका परिसरातल्या गणपतराव कदम मार्गावर एका गटाराचे झाकण गेल्या अनेक दिवसांपासून तुटलेल्या अवस्थेत आहे. या ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्याचबरोबर शाळेच्या बससाठी विद्यार्थ्यांची रांग लागलेली असते. हे गटार पदपथाजवळ असून त्याचे झाकण निघालेले आहे. त्यामुळे प्रवासाच्या घाईत नागरिकांचा अपघात घडू शकतो. अशी शक्यता निर्माण झाली आहे. मात्र प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे.

   

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.