'स्मारक साडेबारा एकरमध्येच हवं'

  Dadar (w)
  'स्मारक साडेबारा एकरमध्येच हवं'
  मुंबई  -  

  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 126 वी जयंती शुक्रवारी सर्वत्र साजरी करण्यात आली. मुंबईमध्येही चैत्यभूमीवर एकच गर्दी पहायला मिळाली. यावेळी इंदू मिल येथे होणाऱ्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा मुद्दा पुन्हा एकदा बाबासाहेबांच्या अनुयायांनी उचलून धरल्याचे चित्र पहायला मिळाले. 

  सरकारकडून साडेबारा एकरमध्ये स्मारक बांधण्यात यावे असं सांगत सीआरझेडच्या नावाखाली सरकारने ढवळाढवळ करू नये, असे अनुयायांनी सांगितले. यावेळी काँग्रेस प्रवक्ते भाई जगताप, माजी खासदार एकनाथ गायकवाड यांनी देखील सरकारने लक्ष घालून आंबेडकरांचे स्मारक लवकरात लवकर बांधावे अशी मागणी केली. तसेच यावेळी स्मारक बांधणीला विलंब का होत आहे? असा सवाल उपस्थित करत विरोधकांनी भाजपावर सडकून टीका केली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

   © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.