Advertisement

कागदी जाहिरातींच्या विळख्यात मुंबई


कागदी जाहिरातींच्या विळख्यात मुंबई
SHARES

महापालिकेकडून होर्डिंग्सवर होणाऱ्या कारवायांमुळं राजकीय पक्षांनी आपला मोर्चा आता कागदी पोस्टर्सकडे वळवलाय. त्यामुळं लोकल ट्रेन, बस स्टॉप, रेल्वे स्थानक, स्कायवॉक, बेस्ट केबिन, टेलिफोन केबिन, मोक्याच्या जागेवरील भिंती कागदी जाहिरातींमुळे विद्रुप होत आहे. हल्ली फ्लेक्स, होर्डिंग्सवर बंदी आल्याने राजकीय नेते, कंपन्या, चित्रपट निर्मात्यांसह मंडळांनी आपला मोर्चा थेट कागदी पोस्टर्सकडे वळवलाय. परिणामी मुंबईत ठिकठिकाणी कागदी पोस्टर्स  लागल्याचं दिसत आहे. या जाहिरातींचा पर्याय तुलनेनं स्वस्त असून त्यातून चांगली प्रसिद्धीही मिळते. त्यामुळे या ठिकाणी कागदी पोस्टर्स लावल्याचे दिसून येत आहे. स्वस्त्यात मिळणाऱ्या जाहिरातीचा वापर करून जाहिरातदार पुष्कळ प्रसिद्धी मिळवताना दिसून येत आहे. अशा पद्धतीच्या प्रसिद्धीतून जाहिरातदार पुष्कळ पैसा कमवीत आहेत. मात्र प्रशासनाला यामधून काहीच महसूल मिळत नाही. याउलट प्रशासनाला या पोस्टर्सची सफाई करून रंगरंगोटी करावी लागते. यासाठी प्रशासनालाच खर्च करावा लागत आहे. याकडे पालिका प्रशासनाचे कुठलेच लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. रात्रीच्यावेळी हे पोस्टर्स चिटकविण्याचे काम संपूर्ण मुंबईत केले जाते. नुकत्याच बनविण्यात आलेल्या मेट्रो आणि मोनोच्या खांबांवर या जाहिराती जास्त प्रमाण दिसून येतात. याबाबत पालिकेच्या अनुज्ञापन खात्याचे अधीक्षक शरद भांडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले या कागदी पोस्टर्स चिटकविणाऱ्यांवर वेळोवेळी कारवाई करण्यात येते.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा