सार्वजनिक शौचालयांची दुरावस्था

 Ghatkopar
सार्वजनिक शौचालयांची दुरावस्था
सार्वजनिक शौचालयांची दुरावस्था
सार्वजनिक शौचालयांची दुरावस्था
सार्वजनिक शौचालयांची दुरावस्था
See all

घाटकोपर - घाटकोपर पश्चिममधील गोळीबार रोड येथील रस्त्याच्या किनारी सार्वजनिक शौचालय आहे. या शौचालयाची अवस्था अत्यंत वाईट असल्याचे दिसून येते. नागरिकांसाठी उभारण्यात आलेली शौचालय कालांतराने त्याचे रुपांतर कचरापेटी आणि गोठ्यात झाले आहे. शौचालय नागरिकांच्या सोईसाठी बांधण्यात येतात. पण, वेळोवेळी यांची स्वच्छता न केल्यामुळे त्यांची दुरावस्था झालीय. शौचालय कचऱ्याच्या ढिगाऱ्यांनी वेढले आहे. आता तर शौचालयाच्या आजू-बाजूला साचलेल्या कचऱ्यामुळे येथे मच्छरांचा प्रभाव जास्त प्रमाणात झालाय. शौचालयाच्या दरवाजे तर चोरीला गेले असून भिंतीचे सिमेंट देखील निघाले आहे. सध्या शौचालयाच्या परिसरात गायी आणि भटक्या कुत्रांचे वर्चस्व आहे. तर पालिकेने शौचालयाच्या दुरूस्तीकडे लक्ष देण्याची गरज असल्याची प्रतिक्रीया नागरिकांनी दिलीय.

Loading Comments