अभ्युदयनगर संस्थेच्या महासंघाविरोधात रहिवाशांचा राडा

काळाचौकी - एका विशिष्ट बिल्डरसाठी काम करणाऱ्या अभ्युदयनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या महासंघाला शनिवारी रहिवाशांनी दणका दिला. त्यामुळे पोलिसांना या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला. मात्र संतप्त रहिवाशांसमोर पोलिसांची मात्र चालली नाही.

काळाचौकी भागातील अभ्युदयनगर वसाहतीच्या एकत्रित पुनर्विकासाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आलेला आहे. ४७ गृहनिर्माण संस्थांच्या या वसाहतींमधील २९ सोसायट्यांमध्ये विकासक निवडीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर १८ सोसायट्यांची निवड प्रक्रिया अद्याप बाकी आहे. मात्र असे असतानाही अभ्युदयनगर सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या संघाने सर्व सोसायट्यांची वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) न घेता रूस्तमजी बिल्डरच्या मे.किस्टोन रियल्टर्सला अंतिम विकासक म्हणून पत्रही दिले.

किस्टोन रियल्टर्सच्या सुधारीत पुनर्विकास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी १७ सप्टेंबर रोजी ललित कला भवनमध्ये विशेष सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्यात आले होते. या सभेत प्रत्येक सोसायटीच्या फक्त चारच सदस्यांना प्रवेश दिला जात होता. या सभेत आपल्यालाही सभेमध्ये प्रवेश मिळावा, अशी इच्छा अनेक रहिवाशांची होती. परंतु, महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी दडपशाहीचा वापर केल्याने रहिवासी संतप्त झाले.

Loading Comments