प्रजासत्ताक दिनानिमित्त घाटकोपरमध्ये परेड

घाटकोपर - प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने घाटकोपरमध्ये ‘परेड आणि ‘झेंडावंदन’ आयोजित करण्यात आले होते. या परेडची सुरुवात गुरुवारी सकाळी 9 वाजल्यापासून झाली. हेगडेवार गार्डन ते आचार्य अत्रे मैदान करत रॅली संपूर्ण घाटकोपर फिरली. आचार्य अत्रे मैदानात कर्नल के. जे. सिंग यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच यावेळी चेंबूरमधील रोचीराम दि थदानी हायस्कूल फॉर हिअरींग (हॅन्डीकॅप) स्कूलच्या मुलांनी राष्ट्रगीतही सादर केले.

परेडमध्ये 60 पेक्षा जास्त शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांनी सहभाग घेतला होता. शाळेतील विद्यार्थ्यांनी संदेश देणारे पाच रथ बनवले होते. स्वच्छ भारत अभियान आणि सांस्कृतिक संदेश देणारे रथ या परेडमध्ये समाविष्ट होते. शिवाजी टेक्निकल स्कूलच्या चित्ररथाने यात प्रथम क्रमांक पटकावला. या रथामध्ये त्यांनी टाकाऊ वस्तू कशा प्रकारे पुन्हा वापरता येतील हे सांगण्याचा प्रयत्न केला होता. शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीमचीही प्रात्यक्षिके यावेळी सादर केली.

Loading Comments