Advertisement

वरळीत साकारली मुंबईतील सर्वात उंच होळी

वरळीतील बीडीडी चाळ परिसरात पीएनबी बँकेला फसवून भारताबाहेर पळून गेलेला डायमंड किंग नीरव मोदी याच्या प्रतिकृतीची ५८ फूट उंच 'होळी' उभारण्यात आली आहे.

वरळीत साकारली मुंबईतील सर्वात उंच होळी
SHARES

होळीच्या निमित्ताने मुंबईतील कानाकोपऱ्यात जल्लोष दिसून येताे. खासकरून 'होलिकादहना'साठी एरवी बिझी असलेले मुंबईकरही एकवटतात. ठिकठिकाणी होळीचं आयोजन करतात. त्यानुसार यंदाही वरळीतील बीडीडी चाळ परिसरातील 'आपला विघ्नहर्ता' या मंडळाने सर्वात उंच होळी उभारून मुंबईकरांचं लक्ष वेधून घेतलं आहे.


किती फूट उंच?

यंदा मंडळाने पीएनबी बँकेला फसवून भारताबाहेर पळून गेलेला डायमंड किंग नीरव मोदी याच्या प्रतिकृतीची ५८ फूट उंच 'होळी' उभारली आहे. ही होळी मुंबईतील सर्वात उंच होळी असल्याचा दावा मंडळाने केला आहे.

मागच्या ५ ते ६ वर्षांपासून 'आपला विघ्नहर्ता' मंडळातर्फे संदेशपर होळी उभारली जाते. अनेक संवेदनशील विषयांवरील प्रतिकृती साकारून सर्वसामान्यांचं त्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानुसार मागील २ आठवड्यांपासून मेहनत करून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पीएनबीला फसवून भारताबाहेर पळालेल्या नीरव मोदीची प्रतिकृती साकारली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा