ना. म. जोशी मार्ग गणेशोत्सव मंडळाचा बाप्पा

  lalbaug
  ना. म. जोशी मार्ग गणेशोत्सव मंडळाचा बाप्पा
  मुंबई  -  

  करी रोड : नेहमी विविध उपक्रम राबवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ना. म. जोशी मार्ग गणेशोत्सव मंडळाने यंदा  83वे वर्षे पूर्ण  केले. मंडळात स्थापन करण्यात आलेली बाप्पाची मूर्ती 18 फुटांची आहे. नेहमीप्रमाणे यंदाही मूर्तीकार विजय खातू यांनी ही मूर्ती साकारली आहे. 11 दिवसांच्या कालावधीत मंडळाच्यावतीने सत्यनारायणची पूजा, भजन आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यासह रक्तदान शिबिराचेही आयोजन केले जाते.  गणेशोत्सवानंतर वृद्धांसाठी मोफत सहलीचे आयोजन केले जाते. यासह सामाजिक संस्थांना मदत करणे हे मंडळाचे वैशिष्ट्य आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड इत्यादी ठिकाणाहून आलेल्या आणि मुंबईत स्थायिक झालेल्या नागरिकांचा मंडळात सहभाग आहे. यावेळी सर्व सण अदजी उत्साहात साजरा केला जातो. अशी माहिती मंडळाचे कार्यकर्ते महेश कदम यांनी दिली. 

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.