कुंभारवाड्यात साचले पाणी

 Marine Drive
कुंभारवाड्यात साचले पाणी
कुंभारवाड्यात साचले पाणी
कुंभारवाड्यात साचले पाणी
See all

गिरगाव - सकाळी गिरगावमधील कुंभारवाडा परिसरातल्या रस्त्यांवर पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. काल दिवसभर पडणा-या मुसळधार पावसामुळे कुंभारवाड्यातल्या अनेक रस्त्यांवर पाणी साचलं होतं. विसर्जन झाल्यानंतर कचरा आणि निर्माल्य या रस्त्यावर मोठ्याप्रमाणात साचला होता. हा कचरा साफ न केल्यामुळे इथल्या रस्त्यांवर पाणी साचलेलं पाहायला मिळालं. या सर्व परिस्थितीमुळे इथल्या नागरिकांना आणि शाळेतल्या मुलांना त्याच घाण पाण्यातून जावे लागले. साचलेल्या पाण्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी ही झाली होती.

 

Loading Comments