Advertisement

खेतवाडीत अवतरला मोदकवाला बाप्पा


खेतवाडीत अवतरला मोदकवाला बाप्पा
SHARES

खाद्यपदार्थांचा वापर करून गणेशमू्र्ती साकारण्याची कला गेल्या काही वर्षांपासून प्रचलित झालीय. इको फ्रेंडली गणेशमूर्तींसाठी प्रसिद्ध असलेल्या खेतवाडीतील तुळशी बिल्डिंग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यावर्षी मिठाईच्या मोदकांचा वापर करून मूर्ती साकारलीय. 1943 ला स्थापन झालेल्या या मंडळानं यावर्षी 73 वर्षे पूर्ण केली आहेत. या मंडळानं  आतापर्यंत विविध खाद्यपदार्थांपासून गणेश मूर्ती साकारल्या आहेत. यावर्षी मंडऴानं मोदकांचा वापर करून गणेशमूर्ती साकारलीय. विविध प्रकारच्या मोदकांचा वापर करून साकारलेली ही गणेशमूर्ती 180 किलो वजनाची आहे. तसंच देखाव्यावर कोणताही खर्च न करता थीम ला महत्त्व देऊन मंडळानं सामाजिक बांधिलकी जपलीय.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा