मैदानांच झालं जंगल !

  Mumbai
  मैदानांच झालं जंगल !
  मुंबई  -  

  तेजसनगर - बीपीटी वसाहतीतील क्रीडांगणाला जंगलाचं स्वरूप आलंय. कामगारांच्या मुलांना खेळण्यासाठी 13 वर्षांपूर्वी हे क्रीडांगण बांधण्यात आलं होतं. पण आता या क्रीडांगणाची दुर्दशा झाली असून क्रीडांगणात सर्वत्र झुडपं वाढली आहेत. त्यामुळं मुलांना खेळण्यासाठी जागा उरलेली नाही. 

  झाडं-झुडपं वाढल्यानं सरपटणा-या प्राण्यांबरोबरच इतर श्वापदांचा येथील वावर वाढलाय. या क्रीडांगणाला तेजसनगर नावाचं गेट होतं. ते चोरीस गेलंय. त्याजागी बीपीटी प्रशासनाकडून अद्याप नवीन गेट लावण्यात आलेलं नाही. त्यामुळं येथे गर्दुले आणि चोरांचा संचार वाढलाय. परिसरातील चो-यांचं प्रमाणही वाढलंय. त्यामुळं येथील नागरिक हैराण झालेत. तसंच या समस्येबाबत तक्रार करायची तरी कुणाकडं? असा प्रश्न त्यांना पडलाय. 

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.