दादर फूल मार्केटच्या रस्त्याची दुरवस्था

 Dadar
दादर फूल मार्केटच्या रस्त्याची दुरवस्था
दादर फूल मार्केटच्या रस्त्याची दुरवस्था
See all

दादर - दादर रेल्वे स्टेशनजवळील फूलमार्केट परिसरातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. खराब रस्ता, टॅक्सींची गर्दी आणि दुतर्फा असलेला फुलवाल्यांचा विळखा यामुळे पादचा-यांना या रस्त्यावरून चालणे अवघड झाले आहे. 

दादर स्टेशनवर उतरून सिद्धीविनायक मंदिर तसेच वरळीला जाण्यासाठी फूल मार्केटजवळील रस्त्यावरून शेअर टॅक्सीची सोय आहे. मात्र या टॅक्सी ज्या ठिकाणाहून वळवल्या जातात, उभ्या केल्या जातात त्या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे.  या रस्त्याच्या दुतर्फा फूलविक्रेत्यांची गर्दी असते. हे फूलविक्रेते, फेरीवाले विक्रीनंतर नको असलेली फुले आणि कचरा या ठिकाणी तसाच टाकून देतात.  त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे.  त्यामुळे टाकाऊ फुलांची आणि कच-याची दुर्गंधी आणि खराब रस्ता यातून मार्ग काढत उपनगरातून सिद्धीविनायक दर्शन आणि नोकरीसाठी येणा-या नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. 

Loading Comments