पोल्ट्री वाहनांच्या दुर्गंधीमुळे वडाळाकर त्रस्त

 Sewri
पोल्ट्री वाहनांच्या दुर्गंधीमुळे वडाळाकर त्रस्त

वडाळा पूर्वमधल्या जेरीबाई वाडिया मार्गावर पार्किंगची सुविधा नसतानाही अनधिकृत रित्या पोल्ट्रीची वहाने उभी केली जात आहेत. या वाहनानमुळे आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरत आहे. शिवाय या परिसरातल्या कचरा कुंड्या भरल्यात त्यामुळे कचरा रस्त्यावर पसरलाय. त्यामुळे नागरिकांचं आरोग्यही धोक्यात आलंय. याविरोधात महापालिकेच्या एफ दक्षिण विभागाकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या. पण पालिका अधिकारी डोळे झाक करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला.  

Loading Comments