Advertisement

वांद्रे स्थानकाच्या जुन्या आठवणींना उजाळा देणारे 'हेरिटेज प्रदर्शन'

पश्चिम रेल्वे प्रशासनातर्फे वांद्रे स्थानकात 'हेरिटेज प्रदर्शन' भरविण्यात आले आहे.

वांद्रे स्थानकाच्या जुन्या आठवणींना उजाळा देणारे 'हेरिटेज प्रदर्शन'
SHARES

ऐतिहासिक अशा वांद्रे स्थानकाच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि वांद्रे स्थानकाबाबत प्रवाशांना माहिती मिळावी, यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनातर्फे वांद्रे स्थानकात 'हेरिटेज प्रदर्शन' भरवण्यात आलं आहे. या प्रदर्शनाचं उद्घाटन मंगळवारी पश्चिम रेल्वेचे वरीष्ठ यांत्रिक विभागाचे अभियंता ए. अग्रवाल आणि मुंबई सेंट्रल विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सुनील कुमार यांच्या हस्ते करण्यात आलं.



प्रदर्शनाची खासियत

प्रदर्शनात इकोफ्रेंडली वस्तूंचा वापर करून डिझेलवर चालणारे इंजिनाचे मॉडेल, ऐतिहासिक काळातील टेलिफोन, बेल, वाफेवर धावणाऱ्या इंजिनाचा वेग बघणारे यंत्र, जुने सिग्नल दिवे, १९व्या दशकातील वेगवेगळ्या प्रकारच्या इंजिनाची छायाचित्रं, जुने पूल, लाकडी आसन, वांद्रे स्थानकाच्या इमारतीचे मॉडेल असं बरचं काही पाहता येणार आहे. त्याशिवाय पश्चिम रेल्वे मार्गावरील जुनी स्थानकाची छायाचित्रे लावण्यात आली आहेत. तसंच, हे प्रदर्शन मंगळवार, बुधवार आणि गुरुवार असे तीन दिवस सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सर्व प्रवाशांसाठी खुले ठेवण्यात येणार आहे.



उपनगरीय राणी

वांद्रे स्थानकाला ऐतिहासिक दर्जा असल्याने या स्थानकाला ‘उपनगरीय राणी’ म्हटलं जातं. वांद्रे स्थानकावर व्हिक्टोरिया गोथिक आणि स्थानिक वास्तुशैलीचे मिश्रण आहे. तसंच, या वांद्रे स्थानकाला खूप मोठा ऐतिहासिक दर्जा प्राप्त आहे, असं पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितलं.







वांद्रे स्थानकाचं रुपडं पालटणार

वांद्रे स्थानकाच्या सौंदर्यीकरणाचे काम पुढील सहा ते आठ महिन्यात करण्यात येणार आहे. स्थानकाच्या सौंदर्यीकरणासाठी एकूण ७ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. तसंच, वांद्रे स्थानकाला लाकडी आसने, एलईडी दिवे लावण्यात येणार असून, हेरिटेज वास्तूचे सौंदर्यीकरण वाढविण्यात येणार आहेत. कौलारू छताच्या देखाव्याला सुंदरता देण्यात येणार आहे. ऐतिहासिक नक्षी आणि ऐतिहासिक कामाला कोणताही धोका न पोहचविता काम करण्यात येणार आहे. दरवाजे, खिडक्या, प्रवेशद्वार यांची देखील दुरूस्ती केली जाणार आहे.



हेही वाचा -

EXCLUSIVE : अण्णांची 'शेवंता' हा तरी कोण?



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा