Advertisement

महिला बचत गट वस्तू विक्री प्रदर्शन


महिला बचत गट वस्तू विक्री प्रदर्शन
SHARES

किंग्ज सर्कल - महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची विक्री आणि प्रदर्शन भरवण्यात आलंय. माटुंगा, किंग्ज सर्कल, भाऊदाजी रोडजवळील पालिका कार्यालयाबाहेर हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. विभागातील महिला बचत गटांनी मोठ्या उत्सुकतेने या प्रदर्शनात सहभाग घेतला. स्वत: तयार केलेल्या वस्तूंची विक्रीही त्या करत आहेत. यामध्ये दिवाळीचा फराळ, पणत्या, कपडे, दागिने, आणि हातानं बनवलेल्या वस्तूंचा प्रदर्शनात समावेश आहे. महिला सक्षमीकरणासाठी नागरी दारिद्र्य निर्मूलन कक्ष, राष्ट्रीय उपजीविका अभियान आणि महिला बालकल्याण योजनेंतर्गत हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. मंगळवारी सकाळी 9 ते रात्री 7 वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुलं राहणार आहे. 
एफ/उत्तर पालिकेचे सहाय्य्क आयुक्त केशव उबाळे, नगरसेविका आणि महिला बालकल्याण समिती अध्यक्ष, बचत गट प्रमुख यांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाला सुरुवात करण्यात आलंय. गेल्या चार वर्षांपासून महिला बचत गटांचे कार्यक्रम राबवत असल्याचं महिला बचत गटाच्या प्रमुख मंगला नाईक यांनी सांगितलं. या माध्यमातून महिलांना स्वत:ची कलाकृती आत्मसात करता येते आणि त्यामुळं त्यांना समाजात वावरण्याची संधी मिळते असंही नाईक यांनी सांगितलं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा