Advertisement

९२ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डाॅ.अरूणा ढेरे

संमेलनाध्यक्षपदाचा बहुमान मिळणाऱ्या अरूणा ढेरे या ५ व्या महिला साहित्यिक अाहेत. या अाधी कुसुमावती देशपांडे, दुर्गा भागवत, शांता शेळके, विजया राजाध्यक्ष या चारच महिला साहित्यिकांनी संमेलनाध्यक्षपद भूषवलं होतं.

९२ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डाॅ.अरूणा ढेरे
SHARES

९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखिका अरूणा ढेरे यांची एकमताने निवड करण्यात अाली अाहे. ११ ते १३ जानेवारीदरम्यान यवतमाळ येथील पोस्टल मैदानावर साहित्य संमेलन होणार अाहे. संमेलनाध्यक्ष ठरविण्यासाठी रविवारी यवतमाळ येथे साहित्य महामंडळाची बैठक सुरू होती. यावेळी एकमताने अरूणा ढेरे यांची निवड करण्यात अाली. 


एेतिहासिक निर्णय

निवडणूक न घेता एकमताने संमेलन अध्यक्ष निवडण्याचा एेतिहासिक निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने घेतला अाहे.  संमेलन अध्यक्ष कोण होणार याबाबत साहित्य वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. अमरावतीच्या ज्येष्ठ कवयित्री प्रभा गणोरकर यांचं नावही अध्यक्षपदासाठी आघाडीवर होतं. तर महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे डॉ. भालचंद्र नेमाडे, डॉ. अरुणा ढेरे आणि ना.धों.महानोर यांची नावे अध्यक्षपदासाठी पाठवण्यात आली होती.


५ व्या महिला साहित्यिक

संमेलनाध्यक्षपदाचा बहुमान मिळणाऱ्या अरूणा ढेरे या ५ व्या महिला साहित्यिक अाहेत. या अाधी कुसुमावती देशपांडे, दुर्गा भागवत, शांता शेळके, विजया राजाध्यक्ष या चारच महिला साहित्यिकांनी संमेलनाध्यक्षपद भूषवलं होतं. १९६१ साली ग्वाल्हेर येथील संमेलनाचे अध्यक्षपद कुसुमावती देशपांडे, १९७५ साली कराड येथील संमेलनाचे अध्यक्षपद दुर्गा भागवत, १९९६ साली आळंदी येथील संमेलनाचे अध्यक्षपद शांता शेळके आणि २००१ साली इंदोर येथे झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपद विजया राजाध्यक्ष यांनी भुषवलं होतं.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा