कुलाब्यात मनसेतर्फे चित्रकला स्पर्धेचं आयोजन

Colaba

See all
  • पूजा वनारसे
  • कला
मुंबई  -  

कफ परेड - नवीन वर्षाच्या सुरुवातीला शालेय विद्यार्थ्यांसाठी जल्लोष चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. बालमनांमध्ये दडलेल्या चित्रकाराला प्रोत्साहन देण्यासाठी मनसेनं हा उपक्रम राबवला. यामध्ये गिरगाव आणि कफपरेडच्या बालचित्रकारांनी मोठा सहभाग नोंदवला. मनसेचे विभाग अध्यक्ष शेखर गव्हाणे यांच्या पुढाकाराने कफ परेडच्या ठाकूरद्वार परिसरातील स. का. पाटील उद्यानात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.
शालेय विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळावा, यासाठी संयोजकांनी आयोजित केलेल्या या अनोख्या उपक्रमाचं आणि त्यांच्या योग्य नियोजनाचं उपस्थित पालकांनीही कौतुक केलं. या स्पर्धेसाठी रंगभरणे, निसर्गचित्र, माझी आवडती गाडी, आवडता खेळ, पावसातील एक दृश्य, वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान असे विषय देण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत माहिती आणि संवेदनशीलता निर्माण व्हावी हा या स्पर्धा आयोजनामागील मुख्य हेतू असल्याचं मनसे उपाध्यक्ष अरविंद गावडे यांनी सांगितले.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.