रस्ता सुरक्षा सप्ताहासाठी बालचित्रकारांनी रेखाटली चित्रे

 Mumbai
रस्ता सुरक्षा सप्ताहासाठी बालचित्रकारांनी रेखाटली चित्रे

लालबाग - गुरुकुल ऑफ आर्टच्या बालचित्रकारांनी रस्ता सुरक्षा सप्ताह या विषयावर आधारित चित्र रेखाटली आहेत. यंदाचं या सप्ताहाचं 28 वं वर्ष आहे. नियमाचं उल्लंघन करून वाहनं रफ अँड टफ पद्धतीनं चालवणाऱ्या युवकांची संख्या जास्त असल्यानं परिणामी अपघातात वाढ होते. मात्र, या वाढत्या अपघातांवर नियंत्रण यावं, यासाठी वाहतूक पोलिसांच्या वतीनं दरवर्षी जानेवारी महिन्यात रस्ता सुरक्षा सप्ताहाचं आयोजन करण्यात येतं. या उपक्रमात आपणही खारीचा वाटा उचलून सहभाग घ्यावा म्हणून या बालचित्रकारांनी पुढाकार घेतला.

Loading Comments