दादर - पुण्यातल्या छत्रपती संभाजी उद्यानात असलेल्या राम गमेश गडकरी यांच्या पुतळ्याची विटंबना संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी केली. त्यामुळे सोमवारी दादरच्या राम गणेश गडकरी चौकात अनेक सिनेकलाकारांनी मूक आंदोलन केले. राम गणेश गडकरी यांच्या स्मृती दिनानिमित्त आदरांजली वाहण्यासाठी सर्व कलाकार दादर येथे जमले होते.