भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालयातर्फे 'म्युझियम कट्टा'

Bhau Daji Marg
भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालयातर्फे 'म्युझियम कट्टा'
भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालयातर्फे 'म्युझियम कट्टा'
See all
  • मुंबई लाइव्ह टीम
  • कला
मुंबई  -  

भायखळ्यातील डॉ. भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालयाच्यावतीनं 'म्युझियम कट्टा' हा एक नवीन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. 'म्यूझियम कट्टा'च्या पहिल्याच कार्यक्रमाला अभिनेता-दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात मराठी चित्रपटांबद्दलची परिस्थिती आणि दर्जा यावर त्यांनी चर्चा केली.

यावेळी या कार्यक्रमाला उपस्थितांनी अमोल पालेकर यांना सिनेमाबाबत प्रश्न विचारले ज्यांना अमोल पालेकर यांनी देखील रंजकपणे उत्तरं दिली. वस्तुसंग्रहालयाला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. त्याचसोबत आजच्या इंटरनेटचा जगात माणसाचा माणसाशी प्रत्यक्ष संवाद कमी झाला असून, त्याची जागा आज फेसबूक, वॉटस्अॅपसारख्या सोशल साईटस् आणि अॅपस्  नी घेतली आहे. वस्तुसंग्रहालयाला जास्तीत जास्त पर्यटकांनी भेट द्यावी त्याचसोबत व्यक्ती व्यक्तींमधला संवाद वाढावा या हेतूनं हा नवीन उपक्रम डॉ.भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालयाच्यावतीने सुरू करण्यात आला आहे. 'म्यूझियम कट्टा' या उपक्रमाद्वारे सिनेमा,चित्रकला,साहित्य अशा अनेक गोष्टींवर 'म्यूझियम कट्टा'च्या माध्यमातून प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या रविवारी चर्चा घडवण्यात येणार आहे.

Loading Comments
© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.