Advertisement

बच्चे कंपनीसाठी चित्रकला स्पर्धा


बच्चे कंपनीसाठी चित्रकला स्पर्धा
SHARES

भायखळा - येथील साध्वी सावित्रीबाई फुले शाळेत रविवारी सकाळी बाल चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात तिसरीत शिकणारी सखी तोडणकरने प्रथम क्रमांक पटकावला. तर तिसरीतल्या रोहन पाटीलने दुसरा आणि पाचवीतल्या आदित्य वाघुलेने तिसरा क्रमांक पटकावला. तिघांना बक्षिसे आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेत शंभरहून अधिक मुलांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा पाहिली ते पाचवीत शिकत असणाऱ्या बच्चे कंपनीसाठी होती. शिवगर्जना प्रतिष्ठान श्री गोपाळ ट्रस्टच्या वतीने बाल चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा