Advertisement

रंग छटांवर आधारीत चित्र प्रदर्शन


रंग छटांवर आधारीत चित्र प्रदर्शन
SHARES

वरळी - वरळीच्या नेहरु सेंटरमध्ये विव ऑफ कलर्स नावाचे चित्रप्रदर्शन 21 ते 27 मार्च दरम्यान भरवण्यात आले आहे. यामध्ये 41 चित्रांचा समावेश असून ही सर्व चित्रे रंगछटेवर आधारीत आहेत. हे चित्रप्रदर्शन सयाराम वाघमारे आणि विद्या बनकर यांचे आहे. चित्रांच्या किंमती 30 हजारांपासून अडीचलाख रुपयांपर्यंत आहेत. बोल्ड कलर्स आणि बोल्ड स्ट्रोक हे वाघमारेंच्या चित्रांचे वैशिष्ट्य् असलेले पहायला मिळते.

या प्रदर्शनात ठेवण्यात आलेले पाऊल वाट हे चित्र अत्यंत आकर्षक आहे. यामध्ये ग्रामिण भागात शेतातून जाणारी नागमोडी पाऊल वाट दाखवण्यात आली आहे. 

ग्रामिण भागातून आलेल्या आणि शहरात स्थित झालेल्या एखाद्या मुंबईकराला बराच वेळ आकर्षित करुन खिळवून ठेवेल अशी एक वेगळी जादू या चित्रामध्ये असल्याचे पहायला मिळते. शेतात उमटलेल्या या पाऊल वाटा स्वयंनिर्मित असतात या संकल्पनेतून हे चित्र रेखाटण्यात आले आहे. या ग्रुप शो मध्ये ठेवण्यात आलेले सर्व चित्रे रंगछटेवर आधारीत आहेत. हे प्रदर्शन विनामुल्य असून सकाळी 11 ते सायंकाळी 7 यावेळेत रसिकांसाठी खुले ठेवण्यात आले आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा