Advertisement

पुलोत्सवात अनुभवा नाविन्यपूर्ण रांगोळींचा अविष्कार

पु.ल.देशपांडे कला अकादमीनं 'पुलोत्सवा'चं आयोजन केलं आहे. पुलोत्सव कार्यक्रमातील खास आकर्षण ठरत आहे रांगोळी प्रदर्शन.

पुलोत्सवात अनुभवा नाविन्यपूर्ण रांगोळींचा अविष्कार
SHARES

पु. . देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 8 नोव्हेंबर 2018 ते 8 नोव्हेंबर 2019 हे पूर्ण वर्ष ग्लोबल पुलोत्सव साजरा करण्यात येणार आहे. भारतातील 20 प्रमुख शहरात तर भारताबाहेर 5 खंडांमधल्या 30 शहरात अशा 50 ठिकाणी हा महोत्सव रंगणार आहे. यानिमित्त पु..देशपांडे कला अकादमीनं 'पुलोत्सवा'चं आयोजन केलं आहे. पुलोत्सव कार्यक्रमातील खास आकर्षण ठरत आहे रांगोळी प्रदर्शन. 



अजरामर कलाकृतींचा नजराना

स्वास्थरंग परिवार आणि  महाराष्ट्र शासनाच्या पु. . देशपांडे कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने दादर इथल्या पु. . देशपांडे सभागृहात रांगोळी प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. स्वास्थ्यरंग प्रस्तुत या रांगोळी उत्सव २०१८ मध्ये एका नाविन्यपूर्ण रांगोळीचा आविष्कार पाहायला मिळाला. 


गिरगावच्या 'स्वास्थरंग' परिवारातर्फे पु.ल. देशपांडे, . दी. माडगूळकर उर्फ गदिमा आणि बाबूजी अर्थात सुधीर फडके यांना रांगोळीतून मानवंदना देण्यात आली आहे. बाबूजींचे गीतरामायण, पुलंचे व्यक्ती आणि वल्ली, .दी. माडगूळकर यांच्या अजरामर कलाकृती रांगोळीतून साकारण्यात आल्या आहेत


नाविन्यपूर्ण रांगोळींचा अविष्कार

रांगोळी उत्सवात मुंबई आणि महाराष्ट्रातील नामवंत रांगोळी कलाकारांनी साकारलेली व्यक्तीचित्र, तांदूळ पोट्रेट, प्रतिबिंब रांगोळी, गालिचा रांगोळीच्या विविध शैलीतील रांगोळ्यांचे दर्शन झाले.


वस्तू मांडणी (Installation) या कला प्रकारातून रांगोळीचे सादरीकरण करण्यात आलं. स्वास्थ्यरंग या ग्रुपचे डॉ. तेजस लोखंडे यांच्या संकल्पनेला प्रेक्षकांकडून चांगलीच पसंती मिळाली.

प्रदर्शन अवधी : १३ नोव्हेंबर २०१८ ते १८ नोव्हेंबर २०१८

वेळ : सकाळी ११ ते रात्री ९ वाजे पर्यंत

स्थळ : प्रदर्शन स्थळ - प्रदर्शन हॉल, पहिला मजला, पु ल देशपांडे कला अकादमी, प्रभादेवी, दादर


हेही वाचा

गड-किल्ले: ठेवा इतिहासाचा, वसा संस्कृतीचा...




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा