गड-किल्ले: ठेवा इतिहासाचा, वसा संस्कृतीचा...

आपल्या महाराष्ट्रातील किल्ले, गड या साऱ्यांना प्राचीन काळापासून अनन्यसाधारण महत्त्व आहे. दिवाळीतील किल्ले बनवण्याची परंपरा ही आपल्या पूर्वजांनी आपला गौरवशाली इतिहास लहान मुलांनी अभ्यासावा याकरता निर्माण केलेली आहे.

SHARE

दिवाळी म्हटलं की फराळ, फटाके, शाळेला सुट्टी, नवीन कपडे आणि किल्ला या साऱ्या गोष्टी आठवतात ना तुम्हाला. तुम्हाला काय मलाही आठवतात. दिवाळीची सुट्टी, नवीन कपडे, फटाके, फराळ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे किल्ला या गोष्टी प्रत्येकानं अनुभवल्या असतील. मला तर आजही आठवतं दिवाळीत किल्ला बनवण्यासाठी आम्ही एवढे उत्साही असायचो ना. एक-दोन महिना आधीच किल्ला बनवायची चर्चा सत्रं भरायची.


गौरवशाली इतिहास

आपल्या महाराष्ट्रातील किल्ले, गड या साऱ्यांना प्राचीन काळापासून अनन्यसाधारण महत्त्व आहे. दिवाळीतील किल्ले बनवण्याची परंपरा ही आपल्या पूर्वजांनी आपला गौरवशाली इतिहास लहान मुलांनी अभ्यासावा याकरता निर्माण केलेली आहे. मात्र किल्ला बनवायची संस्कृती सध्याच्या काळात तशी फार कमीच पहायला मिळते. पण ही संस्कृती आजही जपण्याचा प्रयत्न केला जातो. याचं उदाहरण म्हणजे भव्य किल्ला महोत्सव स्पर्धा.


किल्ला स्पर्धा

स्वराज्य प्रबोधिनीतर्फे दरवर्षी किल्ला स्पर्धा आयोजित करण्यात येते. याच स्पर्धेत सहभागी झालेल्या अभ्युदय नगर इथल्या मुला-मुलांनी एकत्र येत रायगड किल्ला साकारला आहे. पारंपरिक पद्धतीनं किल्ला बनवण्यावर या मुला-मुलींनी भर दिला आहे. रायगड किल्ला साकारण्यासाठी अगदी चिमुकल्यांनी देखील हातभार लावला. या मुलांची मेहनत तुम्हाला खालच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दिसून येईल. हेही वाचा -

दिवाळीनिमित्त गिरगांवात 'किल्ले बांधणी स्पर्धे'चं आयोजन
संबंधित विषय
ताज्या बातम्या