Advertisement

छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वविक्रमी पोर्ट्रेट !


छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वविक्रमी पोर्ट्रेट !
SHARES

मुंबईतील आयआयटी कॅम्पसमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेकॉर्ड ब्रेक पोर्ट्रेटनंतर आता चेतन राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य दिव्य असे पोर्ट्रेट साकारले आहे. 90 बाय 110 फुटांचे भव्य दिव्य असे हे पोर्ट्रेट विक्रोळी येथील कर्मवीर संभाजी मैदानात साकारले गेले आहे. हे पोर्ट्रेट तयार करण्यासाठी तब्बल 75 हजार डीव्हीडी वापरल्या गेल्या आहेत. या पोर्टेटची गिनीज बुक आणि लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार आहे. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून 1 मे रोजी चेतन राऊत यांनी शिवाजी महाराजांचे मोझेइक पोर्ट्रेट बनवायला सुरुवात केली होती. सलग सहा रात्री काम केल्यानंतर रविवारी हे पोर्ट्रेट पूर्ण झाले. हे पोर्ट्रेट पाहण्यासाठी कलाप्रेमींनी चांगलीच गर्दी केली आहे. यानंतरही अजून काही रेकॉर्ड करण्याचा चेतन राऊत यांचा मानस आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा