जहांगीरमध्ये अवतरले देखणे 'बनारस'

Kala Ghoda
जहांगीरमध्ये अवतरले देखणे 'बनारस'
जहांगीरमध्ये अवतरले देखणे 'बनारस'
जहांगीरमध्ये अवतरले देखणे 'बनारस'
जहांगीरमध्ये अवतरले देखणे 'बनारस'
See all
मुंबई  -  

कर्जत तालुक्यातील डोंगरदऱ्यांत वसलेले पिंगळस हे गाव आकाराने लहान असले, तरी या गावाने कलाक्षेत्राला मोठे योगदान दिले आहे. इथल्या निसर्गसौंदर्याने प्रेरित होऊन सचिन सावंत या कलावंताने अनेक निसर्गचित्रं रेखाटली. त्यांची ही लक्षवेधी निसर्गचित्रे कलाप्रेमींच्या आकर्षणाचा विषय ठरत असतानाच त्यांनी साकारलेल्या 'बनारस' चित्रप्रदर्शनाचीही कलाप्रेमींमध्ये चर्चा सुरू आहे. हे चित्रप्रदर्शन जहांगीर कलादालनात भरवण्यात आले आहे. या चित्रप्रदर्शनातील कलाकृती चित्ररसिकांना 5 जूनपर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत निःशुल्क बघता येणार आहेत.

चित्रकार सचिन सावंत यांनी या प्रदर्शनात बनारसचा गंगाघाट हुबेहूब चित्रबद्ध केला आहे. आपल्या कलाकृतीद्वारे ते एकप्रकारे भारतीय संस्कृतीचे दर्शन रसिकांना घडवत आहेत.

सचिन यांच्या 'बनारस' चित्रप्रदर्शनाला मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी नुकतीच भेट दिली. मन, बुद्धी आणि हाताचा समन्वय जुळून आल्यास असे उत्कृष्ट चित्र निर्माण होते, अशी प्रतिक्रिया महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी यावेळी दिली.

असा घडला कलावंत -
कर्जत तालुक्यातील सोलानपाडा डॅमजवळ वसलेले पिंगळस हे सचिन सावंत यांचे मूळ गाव. उणीपुरी तीनशे लोकसंख्या असलेल्या गावात हा कलावंत घडला. अपु-या सोयीसुविधांचा बाऊ न करता निसर्गाच्या विविध रंगांचा अभ्यास करून सचिन यांनी कलेची मनापासून आराधना केली.

निसर्ग रेखाटण्याची प्रेरणा त्यांना ग्रामीण संस्कृतीनेच दिली. त्याचे रंगलेखन रसिकांचे मन मोहून टाकणारे आहे. त्यांची चित्रे पाहताना दुसऱ्याच क्षणी आपल्याला गावसंस्कृतीची आठवण होते. शहरी माणसांच्या मनात गावसंस्कृतीबद्दल एक वेगळीच प्रतिमा असते. या गावसंस्कृतीतूनच निसर्गातले अलौकिक क्षण टिपण्याची, साठवण्याची एक आंतरिक शक्ती सचिन यांचे चित्र पाहून मिळते.

सचिन यांच्या चित्रांचे आजवर मुंबई, जमशेदपूर, दिल्लीच्या वेगवेगळ्या कलादालनांत चित्रप्रदर्शने भरली आहेत. सचिनने यांनी खोपोलीच्या कला महाविद्यालयातून कलाशिक्षण घेतले असून, त्यांचा रंगलेखनाचा स्टुडिओ आजही त्यांच्या जन्मगावीच आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.