पोलीस स्टेशनच्या भिंती देणार सामाजिक संदेश

 Chirag Nagar
पोलीस स्टेशनच्या भिंती देणार सामाजिक संदेश

घाटकोपर - सामजिक संदेश देण्यासाठी घाटकोपरच्या पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. घाटकोपर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट पाटील आणि विद्यार्थी संघटना यांच्या संकल्पनेतून चिरागनगर पोलीस ठाण्याच्या भिंतींवर सामाजिक संदेश देणाऱ्या कलाकृती साकारण्यात आल्या आहेत. विविध विषयांवर समाज प्रबोधन करण्यासाठी ही कलाकृती साकारण्यात आली आहे. यामध्ये बालमजुरी, मुली वाचवा, मुली शिकवा, पाणी वाचवा, झाडे जगवा, व्यसनमुक्ती, अपघात आणि मद्यपान याविषयी जनजागृती करणारे संदेश चित्रातून दिले. यापूर्वी विद्यार्थी संघटनेच्या वतीने रेल्वे स्थानकाच्या भिंतींवर सामाजिक संदेश देणारी चित्रे रेखाटण्यात आली होती.

Loading Comments