Advertisement

मुंबई मेरी जान!


मुंबई मेरी जान!
SHARES

मुंबई...स्वप्ननगरी. डोळ्यांमध्ये स्नप्न घेऊन अनेक जण या स्वप्न नगरीत पाऊल ठेवतात. काहींची स्वप्न साकार होतात, तर काहींची अयशस्वी. पण मुंबईवरचं प्रेम आणि मुंबईची ओढ काही कमी होत नाही! मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. ही मुंबई नगरी कोणालाही आपलंसं करते. मग तो गरीब असो वा श्रीमंत. मुंबईला प्रसिद्ध बनवण्यामागे मच्छिमार बांधवांपासून ते एका सामान्य व्यवसायिकापर्यंत सर्वांचाच हात आहे. त्यामुळे मुंबईच्या हृदयात या प्रत्येकाचे वेगळे स्थान आणि महत्त्व आहे.

कॉमन मॅन

सामान्य माणूस म्हणजेच कॉमन मॅन! लक्ष्मण यांनी देश-विदेशांतील थोरामोठ्यांची व्यंगचित्रे काढली आहेत. त्यांचे कॉमन मॅन नावाचे सर्वसामान्य माणसाचे व्यंगचित्र विशेषच म्हणावे लागेल. हा कॉमन मॅन जसा आधी होता तसाच आताही आहे. चौकड्यांचा कोट, धोतर, टोपी असा त्याचा साधा पोषाख. आर. के. लक्ष्मण यांचा कॉमन मॅन सगळ्यांना इतका आवडतो, की त्याचा एक पूर्णाकृती पुतळाही बनवण्यात आला आहे. वरळी येथे हा पुतळा उभारण्यात आला आहे.

मच्छिमार


मुंबापुरीची खरी ओळख म्हणजे कोळी बांधव. त्यामुळे मुंबईकरांनीही कोळी बांधवांना वेगळे स्थान दिले आहे. माहिममध्ये कोळी बांधवांचा पुतळा उभारण्यात आला आहे. हा कोळी बांधव मुंबईची शान आहे.

डबेवाला

मुंबईचा डबेबाला ही मुंबईची खास ओळख आहे. मुंबईतील नोकरदारांसाठी जेवणाच्या डब्याची ने-आण करणाऱ्या आणि आपल्या वैशिष्टयपूर्ण व्यवस्थापनाने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या मुंबईच्या डबेवाल्यांची दखल महापालिकेनेही घेतली आहे. पालिकेनं 'काम करणारा डबेवाला' पुतळा हाजीअली जंक्शन येथे उभारला आहे.

भाजीवाला

आपल्या रोजच्या खाण्यात भाज्यांचा समावेश असतोच. भाज्यांमुळेच आपलं स्वास्थ्य चांगलं राहतं. त्यामुळे भाजीवाल्याचं आपल्या आयुष्यात खूप महत्त्व आहे. हाच विचार करून दादर वेस्ट येथील प्लाझा थिएटर समोर भाजीवाल्याचा पुतळा उभारण्यात आला आहे. दादर वेस्ट येथे भाजीवाल्यांचा खूप मोठा बाजार भरतो. त्यामुळे हा पुतळा येथे उभारण्यात आला आहे.

आय लव मुंबई

जुहू, वांद्रे, कॉजवे आणि बँडस्टँड सारख्या ठिकाणी मुंबईचे हृदय धडकते. या जागी लाल-सफेद रंगात मोठ्या मोठ्या शब्दांमध्ये 'आय लव मुंबई' असं लिहण्यात आले आहे. 'आय लव मुंबई'मध्ये 'लव' हे हृदयाच्या आकारात दाखवण्यात आले आहे. मुंबईकरांसाठी हे आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहे. अनेक मुंबईकर येथे सेल्फी घेतानाही दिसतात.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा