शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरसावले चिमुकले हात

 lalbaug
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरसावले चिमुकले हात

लालबाग - गुरूकुल स्कूल ऑफ आर्टचे दिव्या सारंंग आणि वैष्णवी माईनकर यांनी समाजप्रबोधन करणारी रांगोळी साकारली होती. धान्य, फळे, भाज्या, कडधान्ये यापासून रांगोळी रेखाटली होती. शेतकर्‍याला मदत करा असा संदेशही बालचित्रकारांंनी दिला. 

"गेल्यावर्षी 2016 सालच्या दुष्काळतही गुरूकुलने 26 हजार रुपयांचा निधी गोळा केला होता. तो निधी दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांंना पोहोचवण्यात आला होता," असे गुरुकुलचे संस्थापक सागर कांबळी यांनी सांगितले.

शेतकर्‍यांंच्या आत्महत्या वर्षानुवर्षे चालूच आहेत. मागील वर्षी कर्जमाफी झाली तरीही पुन्हा शेतकरी संंकटात येतोच. या शेतकर्‍याने वर्षानुवर्षे शेती करून आपले पोट भरले आहे. निसर्गाच्या आक्रमणामुळे भांंबावून गेलेला शेतकरी काहीच उत्पन नसल्याने आत्महत्या करत आहे. त्यामुळे शेतकरी बांंधव आता पुढे कसा जगणार यासाठी साऱ्या महाराष्ट्राने जागृृत होऊन शेतकर्‍याला मदत करण्याची आणि त्याच्या भविष्यकाळाचा विचार करण्याची गरज आहे, हाच या चित्र प्रदर्शनाचा उद्देश होता.

Loading Comments