ही पेंटिंग्ज पहाल तर पहातच रहाल!


ही पेंटिंग्ज पहाल तर पहातच रहाल!
SHARES

वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये 'माय ब्लॅक' या चित्रप्रदर्शन भरवण्यात आल आहे. या प्रदर्शनात कोल्हापूरचे सुप्रसिद्ध चित्रकार युवराज पाटील यांनी काढलेल्या 20 पेंटिंग्जचा समावेश आहे. या प्रदर्शनातील 'ब्लॅक जॅक' नावाचे पांढऱ्या घोड्याचे चित्र पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. 

हा घोडा मुन्ना महाडिक या राष्ट्रवादीच्या कोल्हापूरच्या आमदारांच्या तबेल्यातील आहे. त्या घोड्याचे हुबेहूब चित्र पाटील यांनी रेखाटले आहे.

या पेंटिंग्जच्या किंमती 15 हजारपासून ते 2 लाख 70 हजार रुपयांपर्यंत आहेत.

या प्रदर्शनात प्रवास हा विषय घेऊन चारकोल हे माध्यम वापरले आहे. कोल्हापूरच्या दळवी आर्टमधून कलेचे शिक्षण पूर्ण केलेले युवराज पाटील सध्या पूर्ण वेळ चित्रकार आहेत.

रसिक प्रेक्षकांसाठी हे प्रदर्शन 26 जूनपर्यंत खुले राहणार आहे.

संबंधित विषय