कलेला छंद म्हणून जोपासा - महेश पालेकर

Dadar
कलेला छंद म्हणून जोपासा - महेश पालेकर
कलेला छंद म्हणून जोपासा - महेश पालेकर
कलेला छंद म्हणून जोपासा - महेश पालेकर
कलेला छंद म्हणून जोपासा - महेश पालेकर
See all
  • मुंबई लाइव्ह टीम
  • कला
मुंबई  -  

कला ही अत्यावश्यक बाब असून, छंद म्हणून तिला जोपासल्यास त्याचा आयुष्यात उपयोग होतोच. त्याचबरोबर व्यवसायिक दृष्टीने जरी याकडे पाहिल्यास उदारनिर्वाहाचे उत्तम साधन देखील बनू शकते, असा विश्वास शिक्षणाधिकारी महेश पालेकर यांनी व्यक्त केला. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाअंतर्गत संगीत आणि कला अकादमी विभागाच्यावतीने मंगळवारी दादर पूर्व येथील शिक्षणाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शन आणि पारितोषिक वितरण समारंभ सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी सुप्रसिद्ध छायाचित्रकार दत्ता सावंत, प्रकाश जोगळेकर, उपशिक्षणाधिकारी गोविंद कुलकर्णी, प्राचार्य दिनकर पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाअंतर्गत संगीत आणि कला अकादमी विभागाच्यावतीने मार्च महिन्यात 'मुंबई' या विषयावर आधारित खुली छायाचित्र स्पर्धा 2016-17 चे आयोजन करण्यात आले होते. यंदाचे या स्पर्धेचे 28 वे वर्ष असून, महापालिका शाळेतील विद्यार्थी, मुंबई महापालिका कर्मचारी आणि मुंबईतील मुक्त छायाचित्रकार अशा तीन गटांत या स्पर्धेचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार मुंबई या विषयांतर्गत मुंबई महानगरातील दैनंदिन जीवन, सण, उत्सव, बाजार, आरोग्य सेवा, शैक्षणिक जीवन, वाहतूक, समुद्रकिनारा, उद्याने, इमारती, वास्तू शिल्पे, प्रार्थनास्थळे अशी विविधांगी कलात्मक छायाचित्रे स्पर्धेसाठी आली होती. या छायाचित्रांचे परीक्षण बाळ मुणगेकर, सुप्रसिद्ध छायाचित्रकार दत्ता सावंत, किशोर नार्वेकर या परीक्षकांनी केले.

त्यांनी निवडलेल्या स्पर्धकांचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून, स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान करण्यासाठी मंगळवारी दादर पूर्व येथील शिक्षणाधिकारी कार्यालयात प्रदर्शन आणि पारितोषिक वितरण समारंभ सोहळा आयोजित करण्यात आला होता. विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

 मुक्त छायाचित्रकार म्हणून जितेन हडकर प्रथम, अमित भोसले द्वितीय तर विजय गोहील यांना तृतीय पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये रंजन शेख प्रथम, देवांशी एपुरी द्वितीय आणि साबिर शेख तृतीय पारितोषिकाचे मानकरी ठरले. तर पालिका कर्मचाऱ्यांमध्ये मिलिंद करमरकर प्रथम, महेंद्र पाटील द्वितीय आणि संजय सावकारे तृतीय यांना सन्मानित करण्यात आले असून, प्रत्येक गटात तीन उत्तेजनार्थ पारितोषिकं देण्यात आली.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.