Advertisement

तुमचे प्रश्न आणि नारळीकरांची उत्तरं!


तुमचे प्रश्न आणि नारळीकरांची उत्तरं!
SHARES

सायन - साहित्य अकदमी आयोजित 'लेखक आपल्या भेटीला' हा कार्यक्रम रविवारी सकाळी 11.30 ते दुपारी 1 वाजता साहित्य अकादमी सभागृह, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात पार पडला. 'लेखक आपल्या भेटीला' या कार्यक्रमात जगद्विख्यात खगोल शास्त्रज्ञ आणि साहित्यिक जयंत नारळीकर यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला.

नारळीकर यांनी आपला खगोल शास्त्रातील आणि हिंदी, मराठी, विज्ञानविषयक साहित्यातील प्रवास या कार्यक्रमात सांगितला. कशाप्रकारे लहानपणातील अनुभवातून तसेच वडिलांनी लावलेल्या लिखाणाच्या सावयीमुळे वाचनाची तसेच लिखाणाची आवड निर्माण झाली. त्याचप्रमाणे विज्ञान साहित्य हे कळणे कठीण असते असे बऱ्याचदा वाटते, परंतु ते योग्यरित्या सोप्या भाषेत लिहिले तर लोकांना ते वाचायला नक्कीच आवडते असे नारळीकर यावेळी म्हणाले. यावेळी नारळीकर यांच्यासोबत प्रेक्षकांनी परिसंवाद साधला आणि विज्ञानातील, खगोल शास्त्रातील त्यांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेतली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा