Advertisement

ए.आर. रेहमान यांच्या आई करीमा बेगम काळाच्या पडद्याआड

प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांच्या मातोश्री करीमा बेगम यांचं निधन झालं आहे.

ए.आर. रेहमान यांच्या आई करीमा बेगम काळाच्या पडद्याआड
SHARES

प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांच्या मातोश्री करीमा बेगम यांचं निधन झालं आहे. मागील काही दिवसांपासून त्या आजारी होत्या सोमवारी चेन्नईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रेहमान यांनी आपल्या आईचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला.

करीमा गेल्या वर्षभरापासून आजारी होत्या. २८ डिसेंबर रोजी चेन्नई इथं त्यांनी अखेरचा श्वास घेतला. करीमा बेगम यांच्यावर सोमवारी अंत्यसंस्कार होतील. रेहमान आपल्या आईच्या खूप जवळ होते.

राजगोपाला कुलशेखरन यांच्यासोबत करीमा यांचं लग्न झालं होतं. ते एक संगीतकार होते. रेहमान नऊ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं होतं. शेखरन यांच्या निधनानंतर आई करीमा यांनीच रेहमान यांचं संगोपन केलं होतं.

गायिका श्रेया घोषाल, दिग्दर्शक शेखर कपूर, गायक-संगीतकार सलीम मर्चंट, दिग्दर्शक मोहन राजा, गायिका हर्षदीप कौर यांच्यासह कलाक्षेत्रातील अनेकांनी सोशल मीडियाद्वारे शोक व्यक्त केला.हेही वाचा

सोनू सूदचं 'आय एम नो मसिहा' पुस्तक लाँच

२०२० मधील १०० कोटींच्या घरात मजल मारणारे ५ चित्रपट

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा