Advertisement

आमिर खानला कोरोनाची लागण

आमिरने दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. त्यामुळे आता आमिरच्या संपर्कात आलेल्या सर्वांबरोबरच कदाचित मुख्यमंत्र्यांनाही कोरोना चाचणी करावी लागू शकते.

आमिर खानला कोरोनाची लागण
(File Image)
SHARES

अभिनेता आमिर खान याला कोरोनाची लागण झाली आहे. त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या आमिर क्वारंटाइन झाला आहे. 

याबाबत आमिरच्या प्रवक्त्याने म्हटलं की, आमिर खानला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तो आता होम क्वारंटाईनमध्ये असून त्याची प्रकृती उत्तम आहे.  आमिर खानच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी खबरदारीचा उपाय म्हणून चाचणी करून घ्यावी.

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आमिरने दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. त्यामुळे आता आमिरच्या संपर्कात आलेल्या सर्वांबरोबरच कदाचित मुख्यमंत्र्यांनाही कोरोना चाचणी करावी लागू शकते.

जागतिक जल दिनाचे औचित्य साधून पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेचा गौरव सोहळा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झाला होता.लयावेळी आमिर खान आणि उद्धव ठाकरे शेजारीच बसलेले होते. त्याचबरोबर या कार्यक्रमाला राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, आमिर खानची पत्नी किरण राव आदी उपस्थित होते.

हेही वाचा -

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना पुन्हा कोरोनाची लागण

  1. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा