Advertisement

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि दैनिक 'सामना'च्या संपादक रशमी ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह
SHARES

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि दैनिक 'सामना'च्या संपादक रशमी ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. रश्मी ठाकरे यांची सोमवारी रात्री कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यांची प्रकृती स्थिर असून त्या सध्या वर्षा निवास्थानीच होम क्वारन्टाइन झाल्या आहेत.

राज्याचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांचीही कोरोना चाचणी काही दिवसांपूर्वीच पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर रश्मी ठाकरे यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे राज्यभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाचा विळखा आता मुख्यमंत्र्यांच्या घरालाही पडल्याचं दिसत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरे यांनी ११ मार्च रोजी कोरोनाव्हायरसची लस घेण्यासाठी मुंबईच्या जेजे रुग्णालयात गेले होते. तेव्हा त्यांना प्रथम डोस घेतला होता. पण त्यानंतरही त्यांना कोरोना झाला. त्यामुळे आता अनेक जण लसीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

दरम्यान, राज्यातील कोरोनाव्हायरसच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. रविवारी, २१ मार्च २०२१ रोजी महाराष्ट्रात ३० हजाराहून अधिक COVID 19 रुग्ण नोंदवली गेली. हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा मानला जात आहे.

मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं की, जर लोक कोरोनव्हायरसचे नियम पाळत नाहीत तर सरकारकडे लॉकडाउन हा एकमेव पर्याय असेल. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांना संबोधित करताना याची पुष्टी केली. नागरिकांनी मास्क घालून आणि सामाजिक अंतर राखून नियमांचं काटेकोरपणे पालन करणं आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.



हेही वाचा

महाराष्ट्रातील एका मंत्र्यांचं वसुलीचं टार्गेट १०० कोटी असेल तर, इतरांचं..?

“मुख्यमंत्री पवारांच्या ताटाखालचे मांजर झालेत”

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा