Advertisement

“वाझेची पाठराखण का केली?, राज्यातील जनता विचारतेय”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाझेची पाठराखण का केली? याचं उत्तर द्यावं, अशी मागणी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

“वाझेची पाठराखण का केली?, राज्यातील जनता विचारतेय”
SHARES

भाजपच्या आरोपानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यात असलेले निलंबित सहायक पोलीस निरिक्षक सचिन वाझे लादेन आहे का? आधी फाशी मग चौकशी? अशी पद्धत राज्यात रूढ करायची आहे का? असे प्रश्न उपस्थित करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी वाझेची पाठराखण का केली? याचं उत्तर द्यावं, अशी मागणी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

आशिष शेलार यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांना अनेक प्रश्न विचारले आहेत. सचिन वाझे लादेन आहे का? असा ठाकरी सवाल केलात, मुख्यमंत्री महोदय सचिन वाझे  "ला" देन तर नव्हता? आधी फाशी मग चौकशी? अशा शब्दांच्या पिचकाऱ्या उडवणाऱ्या मुख्यमंत्र्यांना अजूनही वाझे प्रिय वाटतोय ? वाझेची पाठराखण का केली? मुख्यमंत्री महोदय, राज्यातील जनता विचारतेय.

मनसुख हिरन हत्येत सचिन वाझेंचा सहभाग होता. त्याने पुरावे नष्ट केले. त्याने पॅरोलवरील आरोपी कटात वापरला. त्याचे बुकींशी संबध आहेत. आम्ही सांगत होतो! सर्व सत्य एटीएसच्या तपासात समोर आलं! सचिन वाझेला का पाठीशी घालतं होते? ते सत्य मुख्यमंत्र्यांनी सांगावं! अशी मागणी आशिष शेलार (ashish shelar) यांनी केली आहे.

हेही वाचा- ‘त्या’ महिलेने माझ्यावरसुद्धा असेच आरोप केले होते- संजय राऊत

सत्य जनतेसमोर येणारच

दरम्यान, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानासमोर आढलेल्या स्फोटक प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने निलंबित सहायक पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांना अटक केलेली आहे. याच दरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १५ फेब्रुवारीला सचिन वाझेंना आपल्या बंगल्यावर बोलावून घेऊन दरमहा १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचे निर्देश दिल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला. या सगळ्या प्रकाराची चौकशी सीबीआयने करावी या मागणीसाठी परमबीर सिंह सर्वोच्च न्यायालयात देखील गेले आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनिल देशमुख यांना कितीही वाचवण्याचा प्रयत्न केला, तरी तुमचं पितळ उघडं पडणारच आहे. भ्रष्ट गृहमंत्र्यांना पाठीशी घालण्यासाठी प्रमाणाबाहेर जरी खोटं रेटलं, तरी सत्य जनतेसमोर येणारच. अनिल देशमुखांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी देखील देवेंद्र फडणवीस यांनी केली.

(why maharashtra cm uddhav thackeray back sachin vaze bjp mla ashish shelar raised a question)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा