Advertisement

‘त्या’ महिलेने माझ्यावरसुद्धा असेच आरोप केले होते- संजय राऊत

या आरोपांना काही गंभीर आरोप म्हणत नाहीत. त्या महिलेने माझ्यावर सुद्धा असेच आरोप केले होते- संजय राऊत

‘त्या’ महिलेने माझ्यावरसुद्धा असेच आरोप केले होते- संजय राऊत
SHARES

अमरावतीच्या लोकसभा खासदार नवनीत राणा यांनी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांच्यावर धमकावण्याचे आरोप केले आहेत. यासंबंधी एक पत्रही राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांना लिहिलं आहे. त्यावर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यना प्रतिक्रिया देताना सावंत यांची पाठराखण केली.

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (sanjay raut) म्हणाले, या आरोपांना काही गंभीर आरोप म्हणत नाहीत. त्या महिलेने माझ्यावर सुद्धा असेच आरोप केले होते.

मी महिलांना धमकावेल का?

तर दुसरीकडे अरविंद सावंत यांनी खुलासा करत हा आरोप फेटाळून लावला आहे. नवनीत राणा यांनी माझ्यावर केलेला आरोप पूर्णपणे खोटा आहे. त्या मला येता जाता भैया-दादा म्हणून बोलतात. मी ही त्यांच्याशी बोलत असतो. त्यांना समजावून सांगत असतो. पण, त्यांना धमकावलं यांत तथ्य नाही. उलट त्याच सगळ्यांना धमकावत असतात. त्या जेव्हा केव्हा सभागृहात महाराष्ट्र सरकारविषयी वा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्याविषयी बोलत असतात, तेव्हा त्यांच्या बोलण्यातून आणि देहबोलीतून तुम्हाला द्वेष, तिरस्काराची भावना दिसून येईल. मी आयुष्यात कधीही कुणाला धमकावलेलं नाही. महिलांना धमकावण्याचा प्रश्नच येत नाही. मी शिवसैनिक आहे. महिलांना धमकावेल का?, असा खुलासा अरविंत सावंत यांनी केला आहे. 

हेही वाचा- “तू महाराष्ट्रात कशी फिरतेस तेच मी बघतो”, शिवसेना खासदाराने धमकावल्याचा नवनीत राणांचा आरोप

मात्र, तरीही नवनीत राणा यांनी सावंत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करणार असल्याची ठाम भूमिका घेतली आहे.

काय आहे आरोप?

मनसुख हिरेन हत्याकांड आणि सचिन वाझे प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी एका पत्राद्वारे ठाकरे सरकारवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ठाकरे सरकारच्या विरोधातील या प्रश्नांना मी लोकसभेत उपस्थित केलं. एक महिला खासदार होण्याच्या अनुषंगाने मी महाराष्ट्रातील बिघडलेली कायदा सुव्यवस्था तसंच ठाकरे सरकारविरोधात आवाज उठवल्यावर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी मला लोकसभेच्या लाॅबीत “तू महाराष्ट्रात कशी फिरतेस ते मी बघतोच, तुला देखील तुरूंगात टाकेन” अशी धमकी दिली. याआधी देखील शिवसेनेच्या लेटरहेडवर, फोनवर माझ्या चेहऱ्यावर अॅसिड टाकून तसंच मला जीवे मारण्याची धमकी अनेकदा देण्यात आली आहे, असं पत्र नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना लिहिलं आहे.

(sanjay raut denied threatening allegation of navneet rana on arvind sawant)

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा