Advertisement

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना पुन्हा कोरोनाची लागण

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यानंतर आता सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना पुन्हा कोरोनाची लागण
SHARES

राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वेगाने होत असल्याचं दिसून येत आहे.  अनेक जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनही जाहीर करण्यात आला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यानंतर आता सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. मुंडे यांनी ट्वीट करत याची माहिती दिली आहे. 

मुंडे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, ‘माझी दुसऱ्यांदा कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी ही विनंती. मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घेत आहे. काळजी करण्यासारखं काही नाही. सर्वांनी मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सचे पालन करावे व स्वतःची काळजी घ्यावी.

 धनंजय मुंडे यांना याआधी जून २०२० मध्ये कोरोनाची लागण झाली होती. यावेळी  मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. त्यानंतर त्यावेळी त्यांच्यासोबतच त्यांचे दोन स्वीय सहाय्यक, मुंबईतील वाहन चालक, स्वयंपाकी, बीडचा वाहन चालक यांनाही कोरोनाची लागण झाली होती.



हेही वाचा -

मुंबईत कोरोनाच्या रुग्णांमध्ये १४२ टक्के वाढ

  1. राज्यात मंगळवारी १३२ रुग्णांचा मृत्यू, २८,६९९ नवे रुग्ण


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा