Advertisement

वाढदिवशी केक कापण्यावर अमिताभ बच्चन यांचा देशवासियांना प्रश्न


वाढदिवशी केक कापण्यावर अमिताभ बच्चन यांचा देशवासियांना प्रश्न
SHARES

सर्वसामान्यपणे आपल्याकडे केक कापून वाढदिवस साजरा केला जातो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत, एवढंच काय, अगदी अबालवृद्धांपर्यंत सर्वांचेच जन्मदिवस, लग्नाचे वाढदिवस केक कापूनच साजरे केले जातात. पण बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांनी या पद्धतीवर आक्षेप घेतला आहे. 'ही इंग्रजांची पद्धत आहे' अशा शब्दांत अमिताभने या पद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे.


दिवे लावायचे की विझवायचे?

अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर या प्रथेवर आपलं मत व्यक्त केलं आहे. 'इंग्रज त्यांच्या मागे हॅप्पी बर्थ डेची प्रथा सोडून गेले आणि आपणही त्याचे गुलाम झालो आहोत. आपण केक का कापतो? मेणबत्ती का लावतो? ती फुंकून का विझवतो? आपल्या संस्कृतीमध्ये दिवे प्रज्वलित करतात, पण हे आपल्याला तेच विझवायला सांगतात', अशा शब्दांत अमिताभ बच्चन यांनी नाराजी व्यक्त केली आहे.


 

'मेणबत्त्या विझवणे आपली संस्कृती नाही'

बिग बी अमिताभ बच्चन नेहमीच त्यांच्या नाती नव्या आणि आराध्या या दोघींसाठी आयुष्यभराची शिकवण देणारी पोस्ट ट्विटवर लिहितात. त्यांच्या या पोस्ट व्हायरलही होतात. मात्र यावेळी त्यांनी वाढदिवशी केक कापणं आणि मेणबत्ती विझवणं ही आपली संस्कृती नसल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला आहे.


'ठग्ज ऑफ हिंदोस्तान'ची तयारी

नुकताच अमिताभ बच्चन यांचा अभिनेते ऋषी कपूर यांच्यासोबतचा '१०२ नॉट आऊट' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. यामध्ये अमिताभ बच्चन यांनी १०२ वर्षांच्या वृद्धाची भूमिका साकारली आहे, तर ऋषी कपूर यांच्या त्यांच्या ७५ वर्षांच्या मुलाची भूमिका साकारली आहे. लवकरच अमिताभ बच्चन आमिर खान आणि कतरिना कैफ यांच्यासोबत 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटात अॅक्शन करताना दिसणार आहेत!



हेही वाचा

बिग बी अमिताभ बच्चन यांची मुलगीही आता अभिनयात!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा