Advertisement

‘या’ दिग्दर्शकाने सर्वात आधी दिली इरफानची दु:खद बातमी

आपल्या दमदार अभिनय कौशल्याच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावलेला अभिनेता इरफान खानचं मुंबईतील कोकीलाबेन रुग्णालयात बुधवार २९ एप्रिल रोजी दुर्दैवी निधन झालं.

‘या’ दिग्दर्शकाने सर्वात आधी दिली इरफानची दु:खद बातमी
SHARES

आपल्या दमदार अभिनय कौशल्याच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावलेला अभिनेता इरफान खानचं मुंबईतील कोकीलाबेन रुग्णालयात बुधवार २९ एप्रिल रोजी दुर्दैवी निधन झालं. अवघ्या ५४ व्या वर्षी इरफानने जगाचा निरोप घेतला. जबर इच्छाशक्तीच्या जोरावर कॅन्सरवर मात करून इरफान सप्टेंबर २०१९ मध्ये लंडनमधील रुग्णालयातून भारतात परतला होता.

मंगळवारी कोलन इन्फेक्शनमुळे त्यांना कोकीलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यादरम्यान त्यांच्याविषयीच्या अनेक अफवा पसरत होत्या. परंतु इरफान लढवय्ये असून ते लवकर बरे होतील अशी आशा त्याच्या समर्थकांनी व्यक्त केली होती. परंतु बुधवारी दिग्दर्शक शूजीत सरकारने इरफान यांच्या निधनाचं ट्वीट करत ही दु:खद वार्ता सर्वांना दिली. 

हेही वाचा - अभिनेता इरफान खान यांचं निधन

शूजीत सरकार यांनी आपल्या ट्विटर हँडलवर लिहिलेल्या मेसेजमध्ये इरफानच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. ते म्हणाले, की, ' माझ्या प्रिय मित्रा इरफान.. तू लढलास आणि लढलास आणि लढलास.. मला नेहमीच तुझा अभिमान वाटेल. आपण पुन्हा नक्कीच भेटू. सुतापा आणि बाबिल तुमच्याविषयी सहवेदना. तुम्हीही लढलात. या लढाईत तुला जे शक्य होतं ते तू सर्वकाही केलंस सुतापा. ओम शांती. इरफान खानला सलाम.'

अभिनेता इरफान खानने शूजीत सरकार यांच्या दिग्दर्शनाखाली पिकू या सिनेमात काम केलं होतं. 

दोन दिवसांपूर्वीच इरफानची आई सईदा बेगम यांचं निधन झालं. परंतु लॉकडाऊनमुळे इरफानला आईचं अंत्यदर्शन व्हिडिओ कॉलद्वारे घ्यावं लागलं होतं. आईला शेवटचं पाहता आलं नाही ही सल त्याच्या मनात होती.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा