दबंग इज बॅक, पाहा सलमानचा चुलबुल अंदाज


SHARE

‘दबंग’ आणि ‘दबंग २’च्या यशानंतर आता सलमान खान दबंग ३ प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. खुद्द सममाननं या चित्रपटाचं पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे. यासोबतच प्रदर्शनाची तारीखही घोषित करण्यात आली आहे.


पोस्टरमध्ये पोलिसांचा युनिफॉर्म घातलेला सलमान आणि त्याच्या छातीवर चुलबुल पांडे असा बॅच लावलेला दिसत आहे. मात्र सलमानचा चेहरा पोस्टरवर दिसत नाही. या पोस्टरवर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख २० डिसेंबर २०१९ अशी लिहिली आहे. यासोबतच चुलबुल इज बॅक-दबंग ३ असंही लिहलं आहे.

दबंग ३ चे पहिले शूटिंग पूर्ण झाले आहे. सिनेमाचे शूटिंग मध्य प्रदेशच्या महेश्वर इथे झाले आहे. शूटिंग सेटवरून सलमानचे नवे फोटोज समोर येत होते. पण सलमानचा अधिकृत लूक समोर आला नाही. मात्र सोनाक्षी सिन्हानं या चित्रपटातील रज्जोचा लूक सोशल मिडियावर शेअर केला आहे.

सिनेमाचे दिग्दर्शन प्रभु देवा करत आहे. यापूर्वी देखील दोघांनी वाँटेड चित्रपटात एकत्र काम केलं आहे. चित्रपटाची निर्मिती सलमान खान फिल्म आणि अरबाज खान प्रॉडक्शन तर्फे केले जात आहे.


हेही वाचा

सलमान खान विरोधात पोलिसात तक्रार

गोविंदाच्या 'कुली नंबर १' चा रिमेक, 'या' कलाकारांची लागली वर्णी


संबंधित विषय
ताज्या बातम्या