Advertisement

सलमान खान विरोधात पोलिसात तक्रार

आगामी चित्रपट 'भारत'च्या प्रमोशनसाठी सलमान खान कांदिवलीतल्या यशराज स्टुडिओला जात होता. त्यावेळी जुहू इथून निघालेला सलमान एका सिग्नलवर थांबला. पत्रकार अशोक श्यामलाल यांनी सलमानचे फोटो आणि व्हिडीओ काढायला सुरुवात केली.

सलमान खान विरोधात पोलिसात तक्रार
SHARES

अभिनेता सलमान खान विरोधात मुंबईच्या डीएन नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बुधवारी संध्याकाळी सलमान खान काही अंगरक्षकांसोबत सायकलींग करत होता. त्यावेळी एका पत्रकारानं येऊन त्याचे फोटो आणि व्हिडीओ काढायला सुरुवात केली. सलमाननं सांगूनही व्हिडीओ काढणं थांबवलं नाही. त्यामुळे सलमाननं त्या पत्रकाराच्या हातून मोबाईल हिसकावून घेतला.


सलमानचा इशारा

आगामी चित्रपट 'भारत'च्या प्रमोशनसाठी सलमान खान कांदिवलीतल्या यशराज स्टुडिओला जात होता. त्यावेळी जुहू इथून निघालेला सलमान एका सिग्नलवर थांबला. पत्रकार अशोक श्यामलाल यांनी सलमानचे फोटो आणि व्हिडीओ काढायला सुरुवात केली. या प्रकारामुळे मागे ट्रॅफिक होत होतं. त्यामुळे सलमाननं इशाऱ्यानं त्याला तसं न करण्याचा इशारा दिला. पण अशोक श्यामलाल काही ऐकण्यास तयार नव्हते. त्यांना अनेकदा बॉडीगार्ड्सनी देखील रोखण्याचा प्रयत्न केला. पण अशोक यांनी ऐकलं नाही. अखेर सलमान खाननं त्यांचा मोबाइल हिसकावून घेतला.


अंगरक्षकाची तक्रार

काही वेळानंतर सलमानच्या अंगरक्षकानं अशोक यांचा फोन परत केला. याप्रकरणी अशोक श्यामलाल यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावर सलमानच्या अंगरक्षकानं देखील याप्रकरणी एक तक्रार दाखल केली. यामध्ये सलमानचा पाठलाग करण्याचा आणि विना परवानगी व्हिडीओ शूट केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.


हेही वाचा -

सलमान खानच्या 'तेरे नाम'चा सीक्वेल येणार

तीन खानांच्या भेटीमागील रहस्य काय?
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement