सलमान खानच्या 'तेरे नाम'चा सीक्वेल येणार

२००३ साली प्रदर्शित झालेल्या 'तेरे नाम' या चित्रपटानं प्रेक्षकांच्या मनावर चांगलीच छाप सोडली. विशेष चित्रपटातील सलमानची भूमिका प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरली. अगदी चित्रपटातील सलमानची हेअर स्टाइलची क्रेझ तरूणामध्ये चांगलीच व्हायरल झाली.

SHARE

सलमान खानचा तेरे नाम हा चित्रपट सर्वांच्या चांगलाच लक्षात असेलच. लक्षात का नसेल आतापर्यंतच्या त्याच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा चित्रपट मानला जातो. चित्रपटाच्या कथेसोबतच सलमानच्या अभिनयाचं देखील सर्व स्तरातून कौतुक करण्यात आलं होतं. फक्त कौतुकच नाही तर अनेक पुरस्कार देखील तेरे नाम चित्रपटानं पटकावले. आता याच चित्रपटाचा सीक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


सतीश कौशिक दिग्दर्शक

२००३ साली प्रदर्शित झालेल्या 'तेरे नाम' या चित्रपटानं प्रेक्षकांच्या मनावर चांगलीच छाप सोडली. विशेष चित्रपटातील सलमानची भूमिका प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरली. अगदी चित्रपटातील सलमानची हेअर स्टाइलची क्रेझ तरूणामध्ये चांगलीच व्हायरल झाली. आता १६ वर्षानंतर 'तेरे नाम' चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांचं मनोरंजन करायला येत आहे. सतीश कौशिक हेच या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.


सलमानचा नकार

सतीश कौशिक यांनी 'तेरे नाम' २ ची स्क्रिप्ट पूर्ण केली आहे. मात्र सध्या ते 'कागज' चित्रपटामध्ये व्यस्त आहेत. पंकज त्रिपाठीची मुख्य भूमिका असलेल्या 'कागज' चित्रपटाचं काम पूर्ण झालं की 'तेरे नाम' २ चित्रपटाच्या कामाला लागतील. तेरे नाम मध्ये सलमान खान आणि भूमी चावला यांच्या मुख्य भूमिका होत्या. पण 'तेरे नाम'च्या सीक्वेलमध्ये कुणाची वर्णी लागणार हे अजूनही अस्पष्ट आहे. कारण सतीश कौशिक यांची पहिली पसंत सलमान खानच होती. पण सलमान खाननं नकार दिल्याचं बोललं जातंय. त्यामुळे या चित्रपटात नवीन कलाकारांची वर्णी लागू शकते.


हेही वाचा -

श्रद्धा कर्जतमध्ये करतेय 'साहो'चं शूटिंग

जॅान-अर्शदचा 'पागलपंती'
संबंधित विषय
ताज्या बातम्या